खुलताबादेत ईदमिलन उत्साहात

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी) : ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या खुलताबाद शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जातीय --सलोख्याची आणि राष्ट्रीय एकात्मतेची परंपरा जोपासण्यात आली. ईद उल फित्रच्या निमित्ताने माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन, दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी, शब्बीर अहमद व निसार अहमद यांच्या वतीने हॉटेल शंजरी येथे एका भव्य ईद मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या सोहळ्याने शहराच्या सर्वसमावेशक संस्कृतीचे दर्शन घडवले. अध्यक्षस्थानी भद्रा मारुती देवस्थानचे अध्यक्ष मिठू पाटील बारगळ होते. यावेळी प्रमुख अतिथी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, विधान परिषद आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील
डोनगावकर, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, नायब तहसीलदार प्रमोद सावंत व संजय खेळकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू बांधवांची मोठी उपस्थिती. समाजातील सर्व थरातील नागरिक एकमेकांच्या आनंदात सहभागी झाले होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, खुलताबाद हे शहर नेहमीच शांतता आणि प्रेमाचा संदेश देत आले आहे, तर
आमदार सतीश चव्हाण यांनी हा सोहळा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे स्वागत आणि नियोजन अॅड. कैसरोद्दीन, शरफोद्दीन रमजानी व शेख शाहजेब यांनी केले. याप्रसंगी शिवसेना उबाठाचे तालुकाध्यक्ष राजू वरकड, माजी नगराध्यक्ष मुनीबोद्दीन, नवाब कमरोद्दीन, शेख हुस्नोद्दीन, परवेज अहमद, शेख याकूब, शेख शाकीर, अतीक अहमद, शेख अझर, हुसैन पटेल यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.